loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन संघटनेतर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स दिन साजरा

खेड (प्रतिनिधी) - खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन संघटनेतर्फे राष्ट्रीय डॉक्टर्स दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. बुधवार १ जुलै रोजी झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर सदस्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुख्य अतिथी म्हणून चिपळूण येथील माईश्री सोलर टेक्नॉलॉजीचे सर्वेसर्वा सुशील खेडेकर उपस्थित होते. तसेच यावेळी डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा देण्यासाठी खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.माधवी बुटाला व शिवसेना शहरप्रमुख कुंदन सातपुते हे देखील उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कोअर चेअरमन डॉ.गिल्डा यांनी डॉक्टरांचे समर्पित व सेवाभावी जीवन,त्यातील संघर्ष व समस्या याबद्दल भाष्य केले. केजीपीएचे अध्यक्ष डॉ.परेश मळणगावकर यांनी समाज व आरोग्य यांमधील डॉक्टरांचे अनन्यसाधारण महत्व विशद केले. यावेळी मुख्य अतिथी सुशील खेडेकर यांनी वर्तमान व भविष्यासाठी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त अश्या सौरऊर्जेच्या वापराची गरज, महत्त्व व फायदे सर्वांना समजावून सांगितले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg