loader
Breaking News
Breaking News
Foto

आंजर्लेत पार्किंग केलेल्या मच्छिमारांच्या बोटींना भीषण आग

दापोली, १४ जुलै (जितेंद्र गावडे) ः दापोली आंजर्ले येथे पार्किंग केलेल्या तीन बोटींना रात्री उशीरा भीषण आग लागली. आग लागल्याचे दिसून येताच तातडीने सर्वत्र मोबाईलवरून मच्छिमारांनी एकमेकांना निरोप दिला आणि मोठ्या संख्येने या प्रसंगात मच्छिमार धावून आले. आग इतकी भीषण होती की दोन कि. मी. अंतरावरून आग भडकलेली दिसत होती. आग लागली... आग लागली... अशी ओरड सुरू होती. मच्छिमार बांधवांनी कोणाची बोट आहे हे न पाहता मदतीसाठी धाव घेतली. या बोटी हर्णै पागेतील मच्छिमारांनी पार्किंग केलेल्या असल्याचे म्हटले जाते. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg