loader
Breaking News
Breaking News
Foto

किंजळे-कलकरायवाडी येथे रस्त्यावर दरड कोसळून संपर्क तुटला; रामदास कदम व गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सूचनेनुसार तातडीने मदतकार्य सुरू

खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून, किंजळे ग्रामपंचायत हद्दीतील कलकरायवाडी येथे रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याने वाडीचा मुख्य रस्त्यावरील संपर्क तात्पुरता तुटला. त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

घटनेची माहिती मिळताच शिवसेना नेते रामदास कदम आणि महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आदेशानुसार शिवसेनेचे पदाधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख सचिन धाडवे, विभागप्रमुख श्रीकांत शिर्के, उपसरपंच भरत महाडीक, महेश मोरे तसेच युवासेना तालुकाध्यक्ष मिलिंद काते उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

दरड हटवून वाडीचा संपर्क लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक पदाधिकारी प्रयत्नशील असून, परिसरात आणखी दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील विविध भागांमध्ये निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सातत्याने लक्ष ठेवून मदतकार्य सुरू ठेवत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg