loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड शहरात तीन वेळा सायरन वाजला, यंत्रणा सतर्क

खेड ( दिलीप देवळेकर ) रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोकापातळी ओलांडली आहे. आज सकाळी ११ वाजता भरणे नाका पुलाजवळ नदीची पाणीपातळी ७.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली. नदीची इशारा पातळी ५.०० मीटर, तर धोकापातळी ७.०० मीटर आहे. दरम्यान, खेड तालुक्यातील नारंगी नदीलाही पूर आला असून नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. त्यामुळे शेकडो एकर भातशेती पाण्याखाली गेली असून खेड-खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. नदीकाठावरील स्मशानभूमी तसेच काही वीटभट्ट्याही पुराच्या पाण्याखाली गेल्या आहेत. खेड मटन मार्केट येथील पाण्याची परिस्थीती पाहून नागरिकांना सावध राहण्याचा सायरन नगरपालिकेने तीन वेळा वाजविला. १ वेळ सायरन वाजला असता तरी नागरीक सावध झाले असते, असे म्हटले जातेय. पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg