loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रशासनाच्या नाकर्तेपणाला तरुणाचे उत्तर! भर पावसात भिजून संकेत हुमणे आणि सहकाऱ्यांनी तीन गावांसाठी रस्ता केला मोकळा

श्रीवर्धन (संदेश घोलप) प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही रस्त्याचा गंभीर प्रश्न मार्गी न लागल्याने, अखेर बाणगंगा येथील तरुण संकेत हुमणे यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावरील चिखल-माती बाजूला सारून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. प्रशासनाच्या मदतीची वाट पाहूनही काहीच हालचाल न झाल्याने, संकेत यांनी गावातील आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन भर पावसात हे श्रमदान केले.गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर साचलेल्या चिखलामुळे बाणगंगा, साक्षभैरी आणि सावरवाडी या तिन्ही गावांतील नागरिकांचे प्रचंड हाल होत होते. या चिखलातून प्रवास करताना कोणी जखमी होऊ नये, वयोवृद्धांना चालता यावे आणि शाळकरी मुलांना सुरक्षितपणे शाळेत जाता यावे, या सामाजिक भावनेतून हे पाऊल उचलण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या खराब रस्त्यामुळे 'रा. जि. प. शाळा बाणगंगा' येथील शिक्षकांना शाळेत पोहोचण्यास उशीर होत होता. रस्ता मोकळा झाल्यामुळे आता शिक्षक वेळेत पोहोचून मुलांना शिक्षण देऊ शकतील.संकेत हुमणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भर पावसात अंगावर चिखल झेलत अथक परिश्रम केले. त्यामुळे आता गावात दुचाकी आणि रिक्षा सहज येऊ शकेल एवढा रस्ता मोकळा झाला आहे. प्रशासनाच्या सुस्त कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, तिन्ही गावांतील नागरिकांनी संकेत हुमणे यांच्या या कौतुकास्पद कार्याला सलाम केला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg