loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल भारतीय मच्छिमार कष्टकरी खलाशी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली राजापूरचे आमदार किरण भैय्या सामंत यांची भेट

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - अखिल भारतीय मच्छिमार कष्टकरी खलाशी महासंघ यांनी मासेमारी व्यवसायात असताना होणाऱ्या अडचणींबाबत राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण भैया सामंत यांची भेट रत्नागिरीमध्ये घेतली. त्यांच्यासोबत विविध विषयांवर अखिल भारतीय मच्छीमार कष्टकरी कलाशी महासंघाच्या पदाधिकाऱ्याने चर्चा केली. तसेच मासेमारी करत असताना येणाऱ्या अडचणींबाबत महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे चर्चा करत त्यांच्याकडे त्यांची व्यथा मांडल्या व लवकरात लवकर सर्व खालशी वर्गांचे सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन देखील आमदारांनी दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सागरी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत केल्यानंतर या कालावधीमध्ये शेजारी राज्यातील म्हणजेच गोवा, कर्नाटक, गुजरात राज्यातील मासेमारी नौका महाराष्ट्र राज्य सागरी हद्दीत येऊन मासेमारी करतात त्यावर उपाययोजना कराव्या अशी मागणी महासंघाने केली. यासंदर्भात मत्स्य आयुक्त यांच्याशी चर्चा करून कारवाईबाबत आम्ही आदेश देऊ, अशी पद्धतीच आश्वासन राजापूरचे आमदार किरण भैया सामंत यांनी दिले.

टाईम्स स्पेशल

तसेच बोटीवरून समुद्रात पडून एखाद्या खालश्याचा जर मृत्यू झाला आणि त्याचा मृतदेह सापडला नाही तर त्याच्या संदर्भात तो मृत्यू घोषित करण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र मच्छीमारांना लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी व आर्थिक नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न केले जातील आणि शासन निर्णयात कशा पद्धतीने बदलता येऊ शकतो याचा देखील विचार केला जाईल, असंही आमदार किरण भैया सामंत यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा परिषद सभापती महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर, पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर अखिल भारतीय मच्छिमार कष्टकरी खलाशी महासंघाचे अध्यक्ष विकास दाभोळकर, सत्यजित असगोलकर महासंघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg