loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा दरडीचा धोका; खवटीनंतर आता परशुराम घाटाजवळ दगड रस्त्यावर, वाहतुकीबाबत सतर्कतेचा इशारा

खेड (दिलीप देवळेकर ) : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दरडींचे संकट अधिकच गंभीर बनत आहे. खेड तालुक्यातील खवटी येथे मध्यरात्री मोठी दरड कोसळल्याने महामार्ग तब्बल १२ तास पूर्णपणे बंद ठेवावा लागला होता. या घटनेनंतर प्रशासनाने मोठ्या प्रयत्नांनी दरड हटवून वाहतूक पूर्ववत केली. मात्र त्याच दिवशी आता महामार्गावर आणखी एका ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परशुराम मंदिराजवळील ओमेगा हॉटेलच्या शेजारी डोंगरावरील माती व दगड महामार्गावर येण्यास सुरुवात झाली आहे. डोंगराच्या वरच्या बाजूस मोठमोठे दगड सैल झाल्याचे दिसून येत असून ते कोणत्याही क्षणी खाली कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या परिसरातून मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबवून आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि प्रवाशांकडून केली जात आहे.

टाईम्स स्पेशल

खवटी येथील दरडीच्या घटनेमुळे आधीच महामार्गावरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असताना आता परशुराम घाट परिसरातही नव्याने निर्माण झालेल्या धोक्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरांची माती भुसभुशीत झाली असून पुढील काही तासांत आणखी दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणांनी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली असून प्रवाशांनी अत्यावश्यक कारणाशिवाय या मार्गावर प्रवास टाळावा तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg