loader
Breaking News
Breaking News
Foto

नगरसेवक बंटी कीर यांची लोकांच्या प्रश्नांवर नेहमीच आघाडी, मुकुंद हॉटेलसमोरील रस्त्यावरील खड्डे बुजवले

रत्नागिरी : शहरातील मुकुंद हॉटेलसमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सामाजिक कार्यकर्ते डॉ. समीर जोशी यांनी नगरपालिकेचे बांधकाम सभापती बंटी कीर यांच्याकडे लक्ष वेधले. त्यानंतर आज सकाळी बांधकाम सभापती बंटी कीर यांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करून घेतले. यावेळी बंटी कीर यांनी स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी केली. नागरिकांनी या तत्पर कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नगरसेवक बंटी कीर लोकांच्या प्रश्नांवर नेहमीच आघाडीने काम करत असतात, सर्वसामान्य नागरिकांनी केलेल्या सूचनांसाठी ते नेहमी प्रयत्न करत असतात. मुकुंद हॉटेल जवळ पडलेला खड्डा बुजवण्याची मागणी करण्यात आली आणि तत्परतेने कार्यवाही केल्याबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg