श्रीवर्धन - अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात रायगड पोलिसांनी आणखी एक मोठे यश मिळवत श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी येथे धडक कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून लाखो रुपयांचा चरस जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आरोपीने घरातील फायरवूड बॉयलरमध्ये अमली पदार्थ लपवून ठेवले होते. पोलिसांनी घराची झडती घेतल्यानंतर हा साठा उघडकीस आला. या कारवाईत एकूण ६.१९६ किलो चरस, दुचाकी आणि मोबाईल असा ३५ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
श्रीवर्धन पोलिसांना शेखाडी परिसरात चरसची विक्री आणि तस्करी होत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोटारसायकलवरून येणार्या संशयित सादिक इब्राहिम शेखखडे (वय ६३, रा. शेखाडी, ता. श्रीवर्धन) याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत चरस आढळून आल्यानंतर पोलिसांनी अधिक कसून चौकशी केली. त्यावेळी आरोपीने घरात आणखी साठा लपवून ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता फायरवूड बॉयलरमध्ये अत्यंत चलाखीने लपवून ठेवलेला चरस जप्त केला. पोलिसांनी एकूण ६.१९६ किलो वजनाचा चरस, दुचाकी आणि मोबाईल हस्तगत केला.
या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारात गुंतलेल्या टोळीचा मोठा धागा पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून, जप्त करण्यात आलेला चरस नेमका कुठून आणला गेला, तो कुणाला विकला जाणार होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप राठोड करीत असून, रायगड जिल्ह्यात अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.