loader
Breaking News
Breaking News
Foto

आरवली जीवन शिक्षण शाळेत प्रेरणादायी संवाद कार्यक्रम

जीवन शिक्षण शाळा, आरवली क्र. १ येथे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील पदक विजेते तथा वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी ह्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत संवाद साधला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी ओतारी यांच्या हस्ते भितीपत्रकांचे उ‌द्घाटन झाले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी ओतारी यांची मुलाखत घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी आपल्या जीवनप्रवासातील संघर्ष, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा कारकीर्द, प्रशासकीय सेवेपर्यंतचा प्रवास, वेळेचे नियोजन, शिस्त, चिकाटी आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. "ध्येय निश्चित करा, सातत्याने प्रयत्न करा आणि अपयशाला न घाबरता पुढे जात राहा," असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. वि‌द्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे विविध प्रश्न विचारून त्यांच्या अनुभवांचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांनी एक सुजाण नागरिक व्हावे, तसेच माणुसकी जपा हा संदेशही त्यांनी दिला.

टाईम्स स्पेशल

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. नेहा गावडे, उपाध्यक्ष गजानन मेस्त्री, डॉ. प्रसाद प्रभू, संजीव बुच्छलवार, संजीवनी कोकितकर, गणेश (बाळू) पालयेकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी केले, तर सविता सातपुते यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास शिक्षक, पालक व विद्यार्थी यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. या प्रेरणादायी कार्यक्रमामुळे वि‌द्यार्थ्यांमध्ये शिक्षण, क्रीडा आणि प्रशासकीय सेवांविषयी नवचैतन्य निर्माण झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg