loader
Breaking News
Breaking News
Foto

चक्री वादळाचा तडाखा जेएनपीए बंदरात कंटेनर उडाले, दोघांची प्रकृती चिंताजनक

उरण (वार्ताहर) - चक्री वादळाचा फटका जेएनपीए बंदरातील न्हावा शेवा सिपोर्ट टर्मिनलला बसलाय. सोमवारी सकाळी जहाजावरील कंटेनर काढण्यासाठी गेलेले तीन कामगार कंटेनरसह उडाल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. या तीन कामगारातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ऐवढी मोठी घटना घडल्यानंतरही आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर सुविधा उपलब्ध न झाल्याने कामगारवर्गात नैराश्ययाचे वातावरण पसरलेय.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उरण तालुक्यातील जनतेला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून वादळीवार्‍यासह आलेल्या पावसामुळे तालुक्यात हाहाकार माजला आहे. संपुर्ण तालुक्याला पाण्याने वेढले असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. उरण तालुक्याला वादळी पावसाने झोडपून काढले असून चोहिकडे वादळी स्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर अनावश्यक जावू नये, असे सांगूनही नागरिक घराबाहेर पडत आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg