रत्नागिरी: नेतृत्व असं असावं जे केवळ पदाने नाही, तर लोकांच्या मनातल्या विश्वासाने मोठं होतं. संकट काळात धावून जाणारा हक्काचा माणूस आणि कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात खांद्याला खांदा लावून उभा राहणारा खंदा पाठीराखा, अशी ओळख असणारे रत्नागिरीचे शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांचा उद्या, १३ जुलै रोजी वाढदिवस आहे. रत्नागिरीच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर तब्बल २१ वर्षांहून अधिक काळ सातत्याने सक्रिय राहिलेले बिपिन बंदरकर आज रत्नागिरी शहराच्या राजकारणातील एक महत्त्वाचा आणि तितकाच अभेद्य स्तंभ मानले जातात.
बिपिन बंदरकर यांचा राजकीय प्रवास २००१ मध्ये खऱ्या अर्थाने सुरू झाला. रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मधून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून आले. तिथून सुरू झालेला हा प्रवास आजतागायत अविरत सुरू आहे. नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला. रत्नागिरी नगरपालिकेत स्वच्छता सभापती आणि नियोजन समिती यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत कार्यक्षमतेने सांभाळली. शहराचा विकास आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यात ते नेहमीच आघाडीवर राहिले.बंदरकर यांच्या राजकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरील त्यांची निष्ठा. उदय सामंत यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून बिपिन बंदरकर यांची ओळख आहे. २०१४ मध्ये जेव्हा उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला, तेव्हा बिपिन बंदरकर यांनीही त्यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर २०२२ मध्ये राजकीय भूकंपाच्या काळात जेव्हा उदय सामंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हाही बंदरकर सावलीसारखे सामंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले.
शिवसेना शहर प्रमुख म्हणून बिपिन बंदरकर यांची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली रत्नागिरी शहरात शिवसेनेने यशाची नवनवीन शिखरे सर केली आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असोत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, बंदरकर यांच्या अचूक नियोजनामुळे शिवसेनेला शहरात मोठे यश मिळाले. रत्नागिरी नगरपालिकेत तर नगराध्यक्षांसह २३ निर्वाचित नगरसेवक आणि २ स्वीकृत सदस्य अशी २६ जणांची भक्कम फळी निर्माण करून शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आज रत्नागिरी शहरात शिवसेनेचा जो मजबूत तंबू उभा आहे, त्याचे श्रेय बंदरकर यांच्या कुशल नेतृत्वाला जाते. एक शहर प्रमुख म्हणून काम करताना त्यांनी प्रत्येक सहकाऱ्याला नेहमीच मदत केली आहे. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. कार्यकर्त्यांच्या हाकेला ओ देऊन धावून जाणे ही त्यांची खरी ताकद आहे. म्हणूनच, त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहतो. आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दरवर्षी कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी होते, जी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देते. अशा या धडाडीच्या नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांची पुढील राजकीय आणि सामाजिक कारकीर्द यशाची व उत्तम आरोग्याची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.










1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.