loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीमध्ये २६ जुलै रोजी रत्नागिरी जिल्हा व तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने गुणगौरव समारंभ

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी जिल्हा व रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने २०२६ यावर्षीचा शैक्षणिक, कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय इत्यादी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या तेली समाजातील बंधुभगिनींचा गुणगौरव समारंभ रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता गुरुकृपा मंगल कार्यालय पर्याची आळी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्याकरिता जिल्ह्यातील गुणवंताना विनंती करण्यात येत आहे की शिष्यवृत्ती (स्कालरशिप) परिक्षा, इयत्ता १० वी ७०%, इयत्ता १२ वी ६०%, कोणत्याही क्षेत्रातील पदवी, पदविका, मास्टर डीग्री, प्रथम वर्ग अन्य इतर क्षेत्रातील गुणवंतांनी आपली प्रमाणपत्र पाठीमागे पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर लिहून व रत्नागिरी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपली प्रमाणपत्र रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संपर्क कार्यालय (डा. पंकज बंदरकर यांचे घर) तेली आळी, मु.पो.ता.जि.रत्नागिरी ४१५६१२ किंवा श्री संत संताजी महाराज जगनाडे सहकारी पतपेढी तेली आळी, मु.पो.ता.जि.रत्नागिरी ४१५६१२ या पत्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाने दिनांक १५ जुलै २०२६ पर्यंत पोहचतील अशा प्रकारे प्रयत्न करावेत ही विनंती. रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ व रत्नागिरी तालुका तेली समाज सेवा संघ सर्व पदाधिकारी यांच्या वतीने गुणगौरव समिती रत्नागिरी यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg