loader
Breaking News
Breaking News
Foto

राजधानीत ४५ मिनिटांच्या शहा यांच्या भेटीत शिंदेंना मोठे यश , शब्द दिला ....

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री (15 जुलै) दिल्लीच्या दौऱ्यावर असताना केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. शिवसेनेचे नेते तथा खासदार श्रीकांत शिंदे तसेच नुकतेच ठाकरे गटातून आलेले 6 खासदार त्यांच्यासोबत या बैठकीत हजर होते. अमित शाहा आणि शिंदे यांच्यात एकूण 45 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत बंद दाराआड वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे अद्याप समोर आलेले नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार सहा खासदारांना अमित शाहा यांच्याकडून मोठे आश्वासन मिळाल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ताज्या राजकीय घडामोडीवरून असे समोर येते कि ,केंद्रात मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात खासदार श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या वाट्याला आणखी एक राज्यमंत्रिपदही मिळू शकते. या सर्व चर्चा सुरू असतानाच शिंदे यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg