loader
Breaking News
Breaking News
Foto

कशेडी घाटात पुन्हा दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

खेड (दिलीप देवळेकर) - मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात बुधवारी सकाळी दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्थेचा खोळंबा झाला आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळ धामणदिवी गावच्या हद्दीत ही घटना घडल्यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या प्रशासनाने मुंबईकडून गोव्याकडे जाणाऱ्या लेनवरून दुहेरी वाहतूक सुरू करून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) १५ जुलै रोजी राज्यासाठी येलो अलर्ट जारी केला असून, पावसाचे पोषक वातावरण कायम आहे. कोकणातील ठाणे आणि रायगडसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टाईम्स स्पेशल

घाट परिसरात दरडी कोसळण्याचा धोका वाढल्याने नागरिकांनी प्रवासापूर्वी वाहतुकीची स्थिती जाणून घ्यावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg