देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा दत्तवाडीतील नव्याने घातलेल्या जलजीवनची पाईपलाईन फोडून अर्थिक व पाण्याची समस्या निर्माण करणार्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी भडकंबा दत्तवाडीतील ग्रामस्थांनी केली आहे. भडकंबा दत्तवाडी येथे ४५ कुटुंबासाठी व ३५० लोकसंख्या असलेल्या वाडीसाठी वीस वर्षांपूर्वी बांधलेल्या सार्वजनिक विहिरीवर जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाईपलाईन कनेक्शन जमनीतून सुमारे अडीच ते तीन फूट खोल खोदून टाकून ती पुर्ण करण्यात आली.
विहीर ते पाणी साठवीण्याच्या टाकीपर्यंत ठेकेदाराने ग्रामस्थांच्या समवेत ट्रायल घेतली व ती यशस्वी देखील झाली. त्यानंतर काही दिवसातच घरोघरी नळ कनेक्शन कामाला सुरुवात होणार होती. मात्र काही दिवसांनी पाईपलाईन लोखंडी हत्याराने होल पाडून व ती कापून टाकल्याची घटना उघडकीस आली. ठेकेदाराने ती पुन्हा दुरुस्त करून जोडली, पुन्हा ट्रायल घेतली. मात्र पुन्हा तीच पाईपलाईन अन्यठिकाणी फोडण्यात आली. याबाबतची माहिती ग्रामस्थ व ठेकेदार यांनी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिली.
ग्रामपंचायतीने साखरपा पोलीस दूर क्षेत्रात संशयित व्यक्तीच्या नावासहित दिनांक २४/०६/२०२६ रोजी तक्रार दिली व झालेला प्रकार आमदार भैया सामंत यांच्याकडे कथन केला व संबंधितावर कारवाई करण्याची सूचना साखरपा पोलिसांना दिल्या. ऐन पावसाळ्यात पाण्यासारखा विषय ज्वलंत बनावा यासारखी गंभीर गोष्ट कोणती. मात्र संशयितावर कारवाई न झाल्याने भडकंबा दत्तवाडीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून लवकर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन संशयितावर कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.