रत्नागिरी - आपल्या आत काय आहे? जे वाईट आहे ते बाहेर काढून द्या आणि चांगले ते आत्मसात करा. त्यामुळे मन आणि विचार शांत राहतात हा माझा वैयक्तीक अनुभव आहे. असे विचार आज ईन्स्टॉलिंग ऑफीसर म्हणून उपस्थित असलेल्या पीडीजी पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहीत यांनी व्यक्त केले. आज मराठा भवन येथे लायन्स क्लब ऑफ न्यू रत्नागिरीचा पदग्रहण व शपथविधी सोहळा पार पडला. या वर्षीच्या झोन चेअरमन एमजेएफ लायन शिल्पा पानवलकर या वर्षीचे डिस्ट्रिक्ट अॅक्टिव्हिटी चेअरमन एमजेएफ लायन पराग पानवलकर यावेळी उपस्थित होते. मराठा भवन येथे सकाळच्या सत्रात हा सोहळा संपन्न झाला. आपले पाचही क्लब सेवा कार्य करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेत असतात. ते या वर्षीही आपआपले कार्य करण्याव्यतिरिक्त एकत्र मिळून सेवा कार्य करतील अशी मला खात्री असल्याची ग्वाही झेड. सी. लायन शिल्पा पानवलकर यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी नूतन कार्यकारीणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी डिस्ट्रिक्ट अॅक्टिव्हिटी चेअरमन एमजेएफ लायन पराग पानवलकर यांनी आयुष्यात धावाधाव करू नका. जे काम कराल ते ते संथ गतीने केले तरी चालेल मात्र स्वतःची दमणूक होवून थकून जाल असे काम करू नका, असा मोलाचा सल्ला दिला. लायन्समध्ये हेच जास्त अपेक्षित आहे. तरच शेवटपर्यंत आपले मेंबर आपल्या सोबत राहून सेवा कार्य करत राहतील असेही त्यांनी सांगितले. यावेळी लायन पराग पानवलकर यांनी नूतन कार्यकारीणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गयाळवाडी येथील पुष्पदत्त इंग्लिश स्कूलला अॅक्वा प्युरिफायर देणगी स्वरूपात देवून पहिल्याच दिवशी अॅक्टव्हिटी केली. ही भेट पीडीजी पीएमजेएफ लायन जगदीश पुरोहीत यांच्या हस्ते शाळेच्या प्राचार्या इशा गुरव यांच्या सुपुर्द करण्यात आली. यावेळी माजी प्रसिडेंट एम.जे.एफ. नितीन कुलकर्णी, झोन चेअरमन एमजेएफ लायन शिल्पा पानवलकर, या वर्षीचे डिस्ट्रिक्ट अॅक्टिव्हिटी चेअरमन एमजेएफ लायन पराग पानवलकर यावेळी उपस्थित होते.
प्रेसिडेंट म्हणून ला. प्रथमेश गायकवाड, सचिव म्हणून ला. भक्ती प्रथमेश गायकवाड, खजिनदार लायन अभिजित पंडित, प्रथम उपाध्यक्ष ला. धनश्री धनंजय पालांडे यांनी शपथ ग्रहण केली. याशिवाय द्वितीय उपाध्यक्ष ला. प्रदीप मोरे, टेमर लायन दर्शन पवार, सहसचिव, लायन अमित पटेल, ट्रेलट्रिस्टर, लायन वैभव पाटील, जी.एस.टी.चेअरमन लायन हितेंद्र पटेल, जी.एम.टी.चेअरमन लायन श्रीकांत पाटील, जी.एल.टी.चेअरमन ला. ओंकार पाटील, मार्केटींग/कम्युनिकेशन ला. निलेश पटेल, चेअरपर्सन म्हणून ला. महेश पटेल, ला.जान्हवी द. पवार, ला. वसंत पटेल, ला. हितेश पटेल यांची नेमणूक विविध पदावर करण्यात आली आहे. यावेळी क्लबचे बीओ.डी. ला. प्रविण मलुष्टे, MJF ला. नितीन कुलकर्णी, ला. रश्मी प्रविण मलुष्टे, ला. जयंत जोशी, ला. जयश्री जयंत जोशी, ला. सुर्यकांत जाधव उपस्थित होते. यावेळी नविन सदस्य म्हणून समाविष्ट साईप्रसाद खोत आणि तुषार सावंत यांना पिन प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन लायन धनश्री पालांडे यांनी केले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.