loader
Breaking News
Breaking News
Foto

बँक ऑफ इंडिया शाखा शृंगारतळी आणि ग्रामपंचायत खामशेत यांच्यावतीने कृषी दिनानिमित्त यशस्वी आयोजन

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - विभागीय व्यवस्थापक नरेंद्र देवरे आणि उप विभागीय व्यवस्थापक अंजनी कुमार सिंह आझाद यांच्या मार्गदर्शनाखाली, १७.०७.२०२६ रोजी bank of india शृंगारतळी शाखेतर्फे ग्रामपंचायत, खामशेत येथे कृषी दिनानिमित्ताने स्वयं-सहाय्यता बचत गट (SHG) मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला बँकेचे महाव्यवस्थापक शिबा प्रसाद बिश्वाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच रत्नागिरी झोनल ऑफिसचे कृषी विभाग प्रमुख संकेत सकपाळ आणि एस. के. वी. के. चिपळूण प्रभारी अमित सावंत यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मेळाव्यात २२ स्वयं-सहाय्यता गटांना (SHGs) ₹५७.०० लाखांचे मंजुरीपत्रे वितरित करण्यात आली. याशिवाय ₹७.६० लाखांचे किसान वाहन कर्ज तसेच PMFME योजनेअंतर्गत काजू प्रक्रिया उद्योगासाठी ₹३०.०० लाखांचे कर्ज मंजूर करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ₹९४.६० लाखांचे आर्थिक सहाय्य लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाव्यवस्थापक शिबा प्रसाद बिश्वाल यांनी आर्थिक समावेशन, सामाजिक सुरक्षा योजना आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी बँकांची महत्त्वपूर्ण भूमिका यावर प्रकाश टाकला. एस. के. वी. के. चिपळूण प्रभारी अमित सावंत यांनी शेती व पूरक व्यवसायांसाठी उपलब्ध विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

टाईम्स स्पेशल

उप विभागीय व्यवस्थापक अंजनी कुमार सिंह आझाद यांनी बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना सातत्यपूर्ण, ग्राहकाभिमुख आणि अखंड बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे, असे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला बँक ऑफ इंडिया चे शाखा प्रमुख संदीप ढवळे. अधिकारी गौरव गालफाडे. कर्मचारी तुषार तांबे ज्ञानदीप मोरे तसेच खामशेत गावचे सरपंच मंगेश सोलकर, माजी उपसरपंच विष्णू पारदळे, ग्रामपंचायत माजी सदस्य रमेश पारदळे, सिद्धी नरळकर, अस्मिता कदम, वर्षा माचीवाले, बचत गट सी. आर.पी. जान्हवी सोलकर, चंद्रकला नरळकर, तसेच माजी सभापती विलास वाघे तसेच खामशेत गावातील बहुसंख्य महिला व पुरुष वर्ग उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg