loader
Breaking News
Breaking News
Foto

वेळणेश्वरच्या मच्छीमार बांधवांनी घेतली पालकमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट; विकासकामांसाठी मानले आभार

वेळणेश्वर (उमेश शिंदे) : गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथील मच्छीमार बांधवांनी महाराष्ट्राचे उद्योग तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट घेऊन वेळणेश्वर परिसरातील विविध विकासकामांना मंजुरी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले. समुद्रातील मासेमारी हंगाम सुरू असताना मच्छीमार बांधव वर्षातील बहुतांश काळ समुद्रात राहून आपला उदरनिर्वाह करत असतात. सध्या मासेमारी बंदीचा कालावधी असल्याने गेल्या दोन महिन्यांपासून सर्व मच्छीमार आपल्या गावी परतले आहेत. या काळात त्यांनी एकत्र येऊन पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेत परिसरातील विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भेटीदरम्यान वेळणेश्वर गाव आणि मच्छीमार समाजाशी संबंधित विविध विकासकामे, स्थानिक पायाभूत सुविधा तसेच भविष्यातील गरजांवर सकारात्मक चर्चा झाली. विकासकामांना गती मिळाल्याने गावाच्या प्रगतीला चालना मिळत असल्याचे मत मच्छीमार बांधवांनी व्यक्त केले. तसेच पालकमंत्र्यांनी वेळोवेळी विकासासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पालकमंत्री उदय सामंत यांनीही मच्छीमार बांधवांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. मच्छीमार समाजाच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून आवश्यक विकासकामे आणि सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टाईम्स स्पेशल

या सदिच्छा भेटीमुळे मच्छीमार समाज आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. उपस्थित मच्छीमार बांधवांनी भविष्यातही वेळणेश्वरच्या सर्वांगीण विकासासाठी अशाच प्रकारचे सहकार्य मिळत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी भिकाजी पाटील, ज्ञानेश्वर नाटेकर, मिलिंद मोरे, जयदास तांडेल, वसंत शिरगावकर, चंद्रकांत पावसकर, मंदार तांडेल, दिलिप पालशेतकर, नारायण मोरे, जिल्हा परिषद सदस्या नेत्राताई ठाकूर आदि उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg