loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत; कोकणकन्या ६ तास उशिराने

खेड (दिलीप देवळेकर ) - कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक गुरुवारी पुन्हा एकदा कोलमडल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. रायगड जिल्ह्यातील नागोठणे परिसरात पहाटेच्या सुमारास झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे या मार्गावरील महत्त्वाच्या गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका कोकणकन्या एक्सप्रेसला बसला, जी आधीच तीन तास उशिराने धावत होती आणि त्यात आणखी दोन तासांची भर पडून ती तब्बल ५ तास ४० मिनिटे उशिराने मुंबईत पोहोचली. कोकणकन्याच्या या विलंबामुळे मडगावकडे जाणारी १०१०३ मुंबई-मडगाव मांडवी एक्सप्रेसही सहा तासांहून अधिक उशिराने धावू लागली. या दोन्ही महत्त्वाच्या गाड्यांच्या विलंबाचा थेट परिणाम मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या मार्गावरून प्रवास करणार्‍या हजारो प्रवाशांवर झाला असून, अनेक प्रवाशांचे नियोजित प्रवास फिस्कटले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

केवळ तांत्रिक कारणामुळे १०१०४ मडगाव-मुंबई मांडवी एक्सप्रेसदेखील अडीच तास उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी अधिक प्रभावी नियोजन करावे, अशी मागणी होत असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत स्थिती तपासूनच स्थानकावर जावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg