loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलिसांनी दिपकेंना उचललं... मोर्चा जवळ येताच पंतप्रधान मोदींनी सोडलं संसद भवन ,चर्चेत ३ मागण्या

नवी दिल्ली : कॉक्रोज जनता पक्षाचे चलो संसद आंदोलन आता संसदेच्या दारावर पोहचलं आहे. दरम्यान, संसदेकडे कूच करणाऱ्या आंदोलक अभिजीत दिपके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस आंदोलकांवर लाठीचार्ज करत असून त्यांना संसद परिसरातून दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवन सोडलं असून पोलिसांनी अभिजीत दिपके यांना देखील ताब्यात घेतलं आहे. कॉक्रोज जनता पार्टीने चलो संसदची हाक दिल्यानंतर आत संसदेवर मोठ्या प्रमाणावर तरूणांनी मोर्चा काढला आहे. दरम्यान, ज्यावेळी स्वराज जनता पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे मोर्चास्थळी पोहचले त्यानंतर आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतरच पोलिसांना लाठी चार्ज करावा लागला.संसदेत हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसरातून देशाला संबोधित केलं. त्यानंतर संसदेचं कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळं कामकाज तहकूब करण्यात आलं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद परिसर सोडला. त्यांनी परिसर सोडल्यानंतर सुरक्षा दलांनी संसदेचं गेट बंद करून घेतलं आहे. दरम्यान, ज्या गेटमधून पंतप्रधान बाहेर पडत होते त्याच गेटच्या बाहेर पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेतून बाहेर पडण्यासाठी उशीर झाला. ते नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटांनी उशिरा बाहेर पडले.

टाइम्स स्पेशल

सरकारने आंदोलन मोठं होत आहे पाहून चर्चेची दारे उघडली. नड्डा यांनी आंदोलकांसोबत चर्चा करण्याची तयारी दर्शवली. सीजेपी पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनी सांगितलं की आंदोलकांनी नड्डांसोबत झालेल्या चर्चेत सीजेपीने त्वरित तीन मागण्या केल्या आहेत. १ सोनम वांगचुक यांना त्वरित सोडण्यात यावं २ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा ३ आपलं जीवन संपवलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रूपये नुकसान भरपाई द्यावी

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg