loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत ५ जुलै रोजी अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेची कोकण विभागीय बैठक

दापोली (वार्ताहर ) : अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेची कोकण विभागातील पदाधिकारी व समाज कार्यकर्त्यांची विभागीय बैठक रविवार, ५ जुलै २०२६ रोजी दुपारी २ वाजता दापोली येथील हॉटेल टॉप इन टाऊन येथे आयोजित करण्यात आली आहे. कोकण विभाग कार्यकारिणी प्रमुख रमेश गोंधळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र वनारसे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. बैठकीचे आयोजन संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रविंद्र गायकवाड गोंधळी यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीत संघटनात्मक बांधणी, समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा तसेच आगामी उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांतील गोंधळी समाजातील बंधू-भगिनींनी व कार्यकर्त्यांनी या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश प्रवक्ते संभाजी खाडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८७९३६०५६९३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg