loader
Breaking News
Breaking News
Foto

दहीवली, शिंगरी व पुरे येथे दरड व जमिनीला भेगा; भूवैज्ञानिकांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दहीवली, शिंगरी आणि पुरे या गावांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या असून अनेक ठिकाणी जमिनीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुकाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी वरिष्ठ भूवैज्ञानिक व प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसमवेत शनिवारी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी शिवसेना महिला उपजिल्हा संघटिका सुप्रिया पवार, पंचायत समिती सदस्य सुनिता कासार, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, बळीराम निकम, वरिष्ठ भूवैज्ञानिक संतोष शंकर गोंधळी, कनिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मंदार सूर्यकांत मालवणकर, विस्तार अधिकारी भांड, विस्तार अधिकारी विकास देसाई, ग्रामपंचायत अधिकारी दीपक कदम, ग्रामपंचायत अधिकारी स्वप्नील कुसाळकर, राजेंद्र शेलार, शिंगरी ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश पवार, माजी सरपंच रविंद्र कदम तसेच संबंधित अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शिवसेना व प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, बाधित नागरिकांना आवश्यक ती मदत व संरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg