loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीतील विठ्ठल मंदिरात विठ्ठल नामाची शाळा भरली; 'आनंद शिशुवाटिका'तर्फे आषाढी एकादशी दिंडी सोहळा

​सावंतवाडी, (प्रतिनिधी) - येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सुरू असलेल्या विणा सप्ताहादरम्यान २१ जुलै रोजी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या 'आनंद शिशुवाटिका' (बालवाडी) शाळेतील लहान मुलांची विशेष आषाढी एकादशी दिंडी काढण्यात आली. टाळ-घोषाच्या गजरात व वारकरी वेशभूषेत चिमुकल्यांनी या दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मुलांवर अनौपचारिक शिक्षणासोबतच संस्कार घडवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. "सांग विठुराया कधी येशील खेळाया, चिमुकली दिंडी माझी निघाली भेटाया..." अशा अभंग-घोषात वाजत-गाजत ही दिंडी काढण्यात आली. या दिंडी सोहळ्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील वातावरण अधिकच भक्तिमय झाले होते.

टाईम्स स्पेशल

​या सोहळ्यात सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. प्रसाद नार्वेकर, शाळेच्या शिक्षिका प्राजक्ता वेंगुर्लेकर, सुचिता वारंग, विभा पई, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग तसेच विठ्ठल मंदिर समितीचे स्थानिक सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg