loader
Breaking News
Breaking News
Foto

देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार ‘विलास रहाटे’ यांनी कलेतून जपली विठ्ठल भक्ती

देवळे(प्रकाश चाळके)- आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार ‘विलास विजय रहाटे’ यांनी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी विठ्ठल भक्ती अनोख्या पद्धतीने जपण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. विठ्ठल भक्तीच्या आस्था व निष्ठेपायी त्यांनी आषाढ महिन्यात सावळ्या विठ्ठल रूपाच्या अनेक मनमोहक रांगोळ्या साकारल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आषाढी एकादशीच्या भक्तिने बहरलेल्या वातावरणात विलास रहाटे यांनी नदीकाठच्या मऊ मातीपासून छोटीशी वीट तयार करून, ती भाजून पक्की केली. नंतर त्या विटेवर केवळ एका तासाभरात साक्षात श्री पांडुरंगाची प्रतिमा रांगोळीने कलात्मक पद्धतीने साकारली आहे. हि विटेवरील रांगोळी पाहून शब्द उमटतात... ‘‘कलेला लाभला भक्तीचा स्पर्श, विटेवरी अवतरला माझा पांडुरंग.’’ यापूर्वीच्या आषाढी एकादशीला विलास रहाटे यांनी तुळशीच्या पानावर विठ्ठल, मोरपीसावर विठ्ठल, पाण्याखाली विठ्ठलाची रांगोळी साकारून कलाप्रेमींची मने जिंकली होती. तिच परंपरा विलास रहाटे यांनी पुढे सुरू ठेवल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg