loader
Breaking News
Breaking News
Foto

​साखळोली नं. २ चा विकास आता नकाशावर; कृषी संगिनींच्या पुढाकाराने राबविला 'सहभागी ग्रामीण मूल्यांकन' उपक्रम

दापोली (​सागर गोवळे) - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी (कृषी संगिनी) साखळोली नं. २ गावात राबविलेल्या 'रावे' (RAWE) उपक्रमातून गावाच्या विकासाचा नवा मार्ग प्रशस्त केला आहे. या अंतर्गत विद्यार्थिनींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावाची सामाजिक आणि संसाधन स्थिती दर्शविणारा सविस्तर 'गाव नकाशा' तयार केला आहे. 'सहभागी ग्रामीण मूल्यांकन' (PRA) पद्धतीचा वापर करून हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये गावातील प्रत्येक गल्ली, घरे, रस्ते, शाळा, मंदिरे, सार्वजनिक ठिकाणे, पाण्याचे स्रोत आणि शेती क्षेत्राचे अचूक टिपण घेण्यात आले. गाव कसे वसले आहे आणि कोणत्या भागात कोणती संसाधने उपलब्ध आहेत, याचा हा एक जिवंत दस्तऐवज तयार झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमाबाबत बोलताना ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. नकाशा तयार करताना गावातील ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे माहिती दिली, ज्यामुळे गावाची जडणघडण अधिक स्पष्टपणे समजण्यास मदत झाली. हा नकाशा केवळ कागदावरचा भाग नसून, भविष्यातील ग्रामविकासाच्या योजना, कृषी विस्तार उपक्रम आणि शासनाच्या विविध विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी एक महत्त्वाचा आधार ठरणार आहे. कृषी संगिनींनी राबविलेला हा उपक्रम प्रत्यक्ष शेती आणि ग्रामीण समस्यांच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे. ग्रामीण भागातील गरजा ओळखून त्यानुसार कृती आराखडा कसा तयार करावा, याचा अनुभव या विद्यार्थिनींना मिळाला आहे. साखळोली नं. २ च्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg