loader
Breaking News
Breaking News
Foto

विकासकामांना गती देण्यासाठी आमदार भैया सामंत यांच्या दिवसभर बैठका आणि विकास कामांचे निरीक्षण

रत्नागिरी - लांजा-राजापूर मतदारसंघातील विकासकामांना अधिक गती देण्याच्या उद्देशाने आमदार भैया सामंत यांनी गुरुवारी दिवसभर विविध विभागांच्या अधिकार्‍यांसोबत बैठका घेऊन प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा केली. उद्योग, रस्ते, वीजपुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेत विकासकामे मार्गी लावण्यावर भर देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दिवसाची सुरुवात राजापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीने झाली. या बैठकीत राजापूर परिसरात नवीन उद्योग उभारण्यासाठी आणि कारखानदारीला चालना देण्यासाठी उद्योजकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच औद्योगिक गुंतवणूक वाढावी, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि शासकीय सहकार्याबाबत सकारात्मक विचारविनिमय झाला. यानंतर आमदार सामंत यांनी मिर्‍या-कोल्हापूर महामार्गावरील विविध अडचणींची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित अधिकारी आणि अभियंत्यांसमवेत जागेवरच चर्चा करून कामातील अडथळे दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. महामार्गाचे काम वेगाने पूर्ण व्हावे आणि नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध व्हावा, यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला.

टाइम्स स्पेशल

दुपारनंतर महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत लांजा-राजापूर मतदारसंघातील वीजविषयक कामांचा आढावा घेण्यात आला. नवीन वीजजोडण्या, प्रलंबित कामे, कमी दाबाची समस्या, वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना आणि विविध विकासकामांसाठी लागणार्‍या विद्युत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg