खेड (दिलीप देवळेकर) - मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेसच्या महिला डब्यात बेकायदेशीरपणे प्रवेश करून सिगारेट ओढणे, गुटखा खाऊन महिलांना त्रास देणे आणि गोंधळ घालणाऱ्या परप्रांतीय तरुणांविरुद्ध कोकण रेल्वे प्रशासनाने खेड रेल्वे स्थानकावर तातडीची कारवाई केली. या कारवाईमुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. या संतापजनक प्रकाराची माहिती सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास समोर आल्यानंतर कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी तातडीने रेल्वे सुरक्षा बल (RPF) यंत्रणेशी संपर्क साधत कारवाईचे आदेश दिले. संबंधित गाडी रोहा स्थानक सोडून पुढे गेल्याने पुढील प्रमुख स्थानक असलेल्या खेड येथे विशेष पथक तैनात करण्यात आले.
गाडी क्रमांक १२६१८ एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन मंगला लक्षद्वीप एक्स्प्रेस खेड स्थानकात दाखल होताच रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने महिला डब्यावर धाड टाकली. पोलिसांना पाहताच संबंधित तरुणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने डब्याला वेढा घालून बेकायदेशीरपणे महिला डब्यात प्रवास करणाऱ्या तसेच महिला प्रवाशांना त्रास देणाऱ्या सर्व संबंधितांना ताब्यात घेतले. रेल्वे कायद्यानुसार त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात आली असून, या धडक कारवाईनंतर महिला प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडत कोकण रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बलाचे आभार मानले. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.