loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल; पार्किंगमध्ये साचलेल्या पाण्यामुळे मोठी गैरसोय

संगलट(खेड) (इक्बाल जमादार) - दापोली उपजिल्हा रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या कामामुळे आणि मुसळधार पावसामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने तेथे अक्षरशः तलावाचे स्वरूप निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांना पाण्यातून वाट काढत रुग्णालयात जावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुले तसेच गंभीर रुग्णांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. वाहनधारकांनाही पार्किंगमध्ये वाहने उभी करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात अनेक ठिकाणी पाणी साचत असून, रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, पाण्याला योग्य मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि रुग्णांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg