loader
Breaking News
Breaking News
Foto

तिसंगी ग्रामस्थांच्या उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा

खेड - १ मे १९६० रोजी मराठी भाषेला महाराष्ट्राची राजभाषा म्हणून दर्जा प्राप्त झाला. २६ जानेवारी १९६५ पासून प्रशासकीय कारभारात मराठी भाषेचा अधिकृतरित्या वापर सुरु झाला. ऑक्टोबर २०२४ मध्ये केंद्रशासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. परंतु पटसंख्येची अट या शासन निर्णयामुळे ग्रामीण भागातील मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा विषय अतिशय गंभीर असून या विषयाला वाचा फोडण्यासाठी खेड येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अजित अनंतराव भोसले आणि तिसंगी गावचे ग्रामस्थ यांनी खेड पंचायत समिती कार्यालय येथे उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. या गंभीर विषयाच्या जाणिवेतून त्यांनी घेतलेल्या या विधायक निर्णयाला म्हणजेच उपोषणाला खेड तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन निकम यांनी पाठिंबा दर्शवला आहे.

टाईम्स स्पेशल

तशा आशयाचे पत्र त्यांनी उपोषणकर्त्यांना सादर केले आहे. सदर पत्र सादर करताना त्यांच्यासोबत शहरप्रमुख चंद्रशेखर पाटणे, उप शहरप्रमुख राजन निर्मळ, सचिन खेडेकर, संजय मोडसिंग, संदीप चव्हाण, अनंत पवार उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg