loader
Breaking News
Breaking News
Foto

पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या बीएलए यांनी सक्षमपणे काम करावे - वैभव नाईक

मालवण (प्रतिनिधी) : केद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सध्या मतदार यादी पुनर्निरिक्षण (S.I.R.) अभियान युद्धपातळीवर सुरू आहे. आपल्या भागातून जे लोक कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा ज्यांचे दुर्दैवाने निधन झाले आहे अशी नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार आहेत.शासकीय बीएलओ सोबत समन्वय ठेऊन शिवसेनेच्या बीएलए यांनी अशा नावांची काळजीपूर्वक पडताळणी केली पाहिजे. पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये यासाठी सक्षमपणे काम केले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार, उबाठा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख, माजी आमदार वैभव नाईक यांनी काल शुक्रवारी पेंडूर जिल्हा परिषद, चौके पंचायत समिती, मालवण शहर, वायरी भूतनाथ पंचायत समिती मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक घेत संघटनेचा आढावा घेतला आणि संघटना वाढीबाबत तसेच एस.आय.आर.अभियानाबाबत मार्गदर्शन केले.मतदार यादी पुनर्निरिक्षण अभियानात बोगस मतदारांची नावे असतील तर शासकीय बीएलओंच्या निदर्शनास आणून ती मतदार यादीतून वगळली पाहिजेत. त्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनीही बीएलए यांना मार्गदर्शन करावे. यामाध्यमातून मतदार यादी शुद्ध करणे हे पक्षासाठी सर्वात मोठे योगदान ठरेल, असेही यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

याप्रसंगी मालवण शहर येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी,माजी नगरसेवक नितीन वाळके, महिला तालुकाप्रमुख दीपा शिंदे, तालुका समन्वयक पूजा करलकर, नगरसेवक तपस्वी मयेकर, महेंद्र म्हाडगुत, नगसेविका अनिता गिरकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख निनाक्षी शिंदे, युवासेना शहरप्रमुख सिद्धेश मांजरेकर, महेश जावकर, उमेश मांजरेकर, नंदू गवंडी, अन्वय प्रभू, सुमित जाधव, उमेश चव्हाण, मनोज मोंडकर, किशोर गावकर, निलेश दुदवडकर आदी.चौके येथे उपविभागप्रमुख अजित पार्टे, विनोद चव्हाण, सुहास राणे, दिनेश चव्हाण, विष्णू चौकेकर, महेश पेंडुरकर, प्रवीण परब, उत्तम राउत, विलास चव्हाण, विनोद सांडव, संजय पेंडुरकर, सुरेश नाईक, किशोर पाताडे आदी तसेच पेंडूर येथे उपविभाग प्रमुख उमेश प्रभू, दर्शन म्हाडगुत, वंदेश ढोलम, शिवा भोजने, संतोष दळवी, घनश्याम राणे, महेश परब, निखिल शिरोडकर, प्रदीप सावंत,विनोद परब, सदानंद कांबळी, विशाल शिंदे, बळीराम पेंडुरकर, कुणाल पेंडुरकर, दर्शन राऊळ आदी, वायरी येथे सरपंच भगवान लुडबे, जयू लुडबे, प्रदीप वेंगुर्लेकर, दीपक देऊलकर, साक्षी लुडबे, चिंतामणी मयेकर, निलेश केळुसकर, अनिल केळुसकर, आबा केळुसकर, अक्षय वालावलकर, बंड्या लुडबे, श्री.डिचोलकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg