रत्नागिरी - तालुक्यातील मिरजोळे-उक्षी मार्गावरील शीळ (फणसवळे पवार कोंड) येथे आज गुरुवारी सकाळी ६:४५ ते ७ च्या सुमारास दोन शालेय एसटी बसेसची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत ११ ते १५ शाळकरी विद्यार्थी आणि बस चालक जखमी झाले असून, दोन विद्यार्थिनींच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व जखमींना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दांडेआडम (भावे आडोम) येथून रत्नागिरीकडे पटवर्धन हायस्कूल व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन येणार्या बसची समोरून जाणार्या दुसऱ्या एसटी बसशी जोरदार धडक झाली.
प्राथमिक अंदाजानुसार, एका बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला. धडक एवढी तीव्र होती की दोन्ही बसेसच्या पुढच्या भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. अपघात घडताच बसमधील विद्यार्थ्यांनी आरडाओरडा सुरू केला, तो ऐकून स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले. या अपघातात काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील दोन विद्यार्थिनींच्या जबड्याला आणि दातांना जबर मार लागल्यामुळे त्यांना रुग्णालयात ॲडमिट करण्यात आले आहे, तर काही विद्यार्थ्यांना प्राथमिक तपासणीनंतर घरी सोडण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या पालकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
अपघाताची बातमी समजताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील आणि युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, उपशहर प्रमुख नितीन तळेकर, समाजसेवक आदेश (आबू) भाटकर यांनी तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या या नेत्यांनी जखमी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. तसेच रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना तातडीने आणि सर्वोत्तम वैद्यकीय उपचार मिळण्याची व्यवस्था केली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.