खेड - खेड तालुक्यातील नागरिक व विद्यार्थ्यांच्या ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडत भारतीय जनता पक्षाचे गटनेते तथा खेड नगरपरिषदेचे नगरसेवक रहीम युसुफ सहिबोले सोबत भारतीय जनता पार्टीचे खेड मंडळचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अॅड. मिलिंद रविंद्र नांदगावकर, भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे यांनी मुख्याधिकारी यांना जन्म व मृत्यू दाखल्यांबाबत निवेदन सादर केले.
सध्या नगरपरिषदेच्या जन्म-मृत्यू नोंदणीच्या ऑनलाइन पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांना जन्म व मृत्यू दाखले मिळविण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे शैक्षणिक प्रवेश, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, शासकीय योजना तसेच इतर विविध प्रशासकीय कामांमध्ये विलंब होत असून नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन खेड नगरपरिषद स्वतः पुढाकार घेत असून, तालुक्यातील प्रत्येक शाळेला पत्राद्वारे सूचना देत आहे की, ऑनलाइन पोर्टल तात्पुरते बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश अथवा इतर शैक्षणिक प्रक्रिया थांबवू नयेत. पोर्टल सुरळीत सुरू झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांचे जन्मदाखले व मृत्यूदाखले उपलब्ध करून दिले जातील.अशा प्रकारचे पत्र प्रत्येक शाळेला देण्यात येत आहेत.
हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचे विचार करता सकारात्मक पाऊल मानले जाणार आहे. यासाठी तात्पुरत्या काळासाठी अॅाफलाईन दाखले देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर पोर्टलमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून जन्म-मृत्यू दाखले वेळेत, सुलभ व पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून द्यावेत, तसेच नागरिकांना अनावश्यक हेलपाटे मारावे लागू नयेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. सर्वसामान्य नागरिक व विद्यार्थ्यांच्या हितासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने आवाज उठवत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.