loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनम वांगचूक रुग्णालयात दाखल, जंतरमंतरवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

नवी दिल्ली - गेल्या २० दिवसांपासून जंतरमंतर येथे उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी त्यांना उचलून रुग्णालयात नेले. यावेळी उपोषणस्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. नीट परिक्षेचा पेपर फुटल्यानंतर केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सोनम वांगचूक यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून उपोषणाचे हत्यार उपसले आहे.त्याचे वजन उपोषणाने २० किलो घटले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी काल २० जुलै रोजी चलो संसदची घोषणा दिली. देशातील कांद्याच्या किंमतीसाठी सरकारला जबाबदार धरण्यात येते, तर लाखों विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षणव्यवस्थेती गैरकारभाराला जबाबदार का धरु नये? असा प्रश्न उपस्थित करुन नीट पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. यास जबाबदार केंद्र सरकार असल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान जंतर मंतर येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg