loader
Breaking News
Breaking News
Foto

दोडामार्ग—तिलारी मार्गावरील धोकादायक झाडांचा प्रश्न ऐरणीवर

साटेली, भेडशी (प्रतिनिधी) : दोडामार्ग ते तिलारी या महत्त्वाच्या मार्गाचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. मात्र, या कामादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा असलेली अनेक मोठी झाडे न तोडता त्यांच्या आजूबाजूची माती काढून टाकण्यात आल्याने आता पावसाळ्यात ही झाडे उन्मळून पडण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. रस्ता रुंदीकरण करताना झाडांच्या मुळांना आधार देणारा मातीचा भराव हटविण्यात आला. परिणामी, झाडांचा नैसर्गिक आधार कमी झाला असून सततच्या मुसळधार पावसामुळे ती झाडे हळूहळू कलू लागली असून काही ठिकाणी उन्मळून पडण्यास सुरुवात झाली आहे. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गोवा, बेळगाव आणि कोल्हापूरला जोडणारा हा जवळचा व अत्यंत वर्दळीचा मार्ग असल्याने या रस्त्यावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात हलकी व जड वाहने धावत असतात. अशा परिस्थितीत एखादे झाड अचानक रस्त्यावर किंवा वाहनावर कोसळल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे की, रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असतानाच धोकादायक झाडांचे योग्य नियोजन करून तोडणे किंवा अन्य सुरक्षित उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नसल्याने या परिस्थितीस नेमके जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग आणि ठेकेदार यांनी संयुक्त पाहणी करून धोकादायक झाडांबाबत तातडीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg