loader
Breaking News
Breaking News
Foto

दरडग्रस्त दहिवलीतील कुटुंबांना छत्रपती मराठा नागरिक सहकारी पतसंस्थेचा मदतीचा हात

खेड (प्रतिनिधी) : संततधार पावसामुळे खेड तालुक्यातील दहिवली येथे दरड कोसळून बाधित झालेल्या कुटुंबांना छत्रपती मराठा नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादितच्या वतीने मदत करण्यात आली. दरडग्रस्त भागाची पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांची भेट घेत त्यांना आवश्यक जीवनावश्यक साहित्य व मदतीचे वितरण करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी पतसंस्थेचे चेअरमन शरद शिवराम शिर्के यांनी नैसर्गिक आपत्तीच्या काळात समाजाप्रती असलेली जबाबदारी ओळखून गरजूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही प्रत्येक संस्थेची सामाजिक बांधिलकी असल्याचे सांगितले. भविष्यातही अशा संकटग्रस्त नागरिकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी संस्था सदैव तत्पर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

या मदतकार्यावेळी संस्थेचे व्यवस्थापक राकेश चव्हाण, कर्मचारी अमित भुवड व कुमार साहिल साळवी, संस्थेचे सभासद रोहन विचारे, सुखदेव पवार, कृष्णा शेलार, प्रफुल मोरे, विनोद मोरे तसेच दहिवडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थितांनी दरडग्रस्त नागरिकांना धीर देत त्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg