loader
Breaking News
Breaking News
Foto

राम मंदिरातील कोटयावधी रुपये लुट प्रकरणी दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने रघुपती राघव सत्याग्रह

दोडामार्ग (प्रतिनिधी) - अयोध्या येथील श्रीराम मंदिरात रोख रक्कम, सोन, चांदी, जे भक्तांनी दान केले याची लुट झाली आहे. यामुळे देशभरात रामभक्त हिंदू बांधवकडून या लुटीचा निषेध करून लुटारूवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. राम मंदिरातील लुट प्रकरणी गुरुवारी दोडामार्ग राष्ट्रीय काँग्रेसवतीने सिध्दीविनायक मंदिरात अध्यक्ष अरविंद मोडकर यांच्या नेतृत्वाखाली रघुपती राघव सत्याग्रह करण्यात आला. यात अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

करोडो लोकांचे दैवत श्री राम मंदिरातील लुट प्रकरणी अद्याप तेथील सरकारने हवी तशी कारवाई केली नाही. मुख्य लोक आजही मोकळे आहेत सरकार यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग येथे रघुपती राघव सत्याग्रह सुरू करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

दोडामार्ग येथे रघुपती राघव सत्याग्रह आंदोलन वेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, सेवादल जिल्हाध्यक्ष अजिंक्य गावडे, तालुकाध्यक्ष बाबू गवस, संतोषकुमार दळवी, जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव नाईक, सुभाष दळवी, सुधीर चांदेलकर, सुधीर गवस, श्रीकृष्ण गवस, संदीप नाईक, सोनू गवस, मोहन गवस, बाबाजी सावंत, सुशांत बोंद्रे, दिनानाथ उगवेकर, मदन सावंत, तुकाराम नाईक, विजय हेरेकर, देवानंद हजारे, इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg