खेड (दिलीप देवळेकर):- राज्याचे सांस्कृतिक मंत्री ‘आशिष शेलार’ यांचे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौर्यावेळी बीड रेल्वे स्थानकात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्साहपूर्ण वातावरणात जंगी स्वागत केले. दौर्यादरम्यान त्यांनी राज्य सरकारच्या लोककला आणि लोककलावंतांच्या हितासाठी राबविण्यात येणार्या विविध निर्णयांची माहिती दिली.
यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचे विशेष आभार मानले. लोककलावंत आणि कला पथकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शासनाने भांडवली तसेच प्रयोगात्मक अनुदानात दुप्पट वाढ केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कोकणातील पारंपरिक ’नमन’ या लोककलेचा लोककला योजनेत समावेश करून त्यासाठीही अनुदान वाढविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कोकणातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक लोककलेचा सन्मान जपण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, महाराष्ट्रातील लोककला राज्यभर, देशभर आणि विदेशात पोहोचावी यासाठी लोककला महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोककलावंतांना अधिक संधी, व्यासपीठ आणि सन्मान मिळावा, यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील डळमळीत झालेल्या सांभाळ केंद्राच्या स्थितीचा जिल्हाधिकार्यांकडून आढावा घेण्यात येणार असून, त्या केंद्रासाठी आवश्यक ती भरीव मदत करण्याचा निर्णय शासन घेणार असल्याचेही सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.