पनवेल :- महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी खांदा कॉलनी सेक्टर-१३ येथील अश्विनी सोसायटी, श्री स्वामी समर्थ सोसायटी आणि श्री स्वामी दर्शन सोसायटी येथे "नगरसेवक सोसायटीच्या दारी" या उपक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींनी भेट देत नागरिकांच्या विविध समस्या व सूचनांची माहिती घेतली. यावेळी परिसरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते तसेच इतर नागरी सुविधांबाबत रहिवाशांशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
नागरिकांनी मांडलेल्या समस्या आणि सूचनांवर सकारात्मक विचार करून त्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन उपस्थित नगरसेवकांनी दिले. या भेटीदरम्यान नगरसेवक लतीफ शेख, नगरसेवक केतन भगत, नगरसेविका आर्या प्रवीण जाधव, नगरसेविका मनीषा म्हात्रे, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव उपस्थित होते. तसेच सोसायटीचे प्रकाश कोळी, राजासाहेब वडिले, प्रभाकर ढवळे, धनंजय लिंगे, स्वेता हांडे, कमल माने यांच्यासह तिन्ही सोसायट्यांचे पदाधिकारी आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये विनय ढवळे, दत्ता ठुबे, प्रशांत पाटील, प्रभाकर चंदणे, काजरोळकर, अमोल वाळुंज आणि निखिल ढवळे यांनीही सहभाग नोंदविला. या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळाली असून, स्थानिक प्रश्नांच्या निराकरणासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय अधिक दृढ होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.