loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने व्यापाऱ्यांना सुट्या पैशांचा पुरवठा करण्याची मागणी

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व बँकेत जाऊन वैभववाडी तालुक्यातील सर्व व्यापार्‍यांना सुट्टी पैसे मिळावे, अशी मागणी करत निवेदन देण्यात आले. वैभववाडी बाजारपेठेत व्यापार्‍यांना सुट्या पैशाची चणचण भासत असल्याचे व्यापार्‍यांमधून बोलले जात होते. त्यामुळे सोमवारी तालुका व्यापारी संघाच्यावतीने तालुक्यातील भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक व सारस्वत बँक आदी बँकांमध्ये जाऊन संघाच्यावतीने व्यापार्‍यांना सुट्टे पैसे मिळावे, अशी मागणी केली. यावेळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष संजय सावंत, तालुका अध्यक्ष तेजस आंबेकर, उपाध्यक्ष अरविंद गाड, कार्यकारिणी सदस्य रवींद्र पाटील, वसंत पटेल, सुरेंद्र नारकर, मनोज सावंत, संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg