loader
Breaking News
Breaking News
Foto

साटेली-भेडशी परिसरात गेल्या सात दिवसांपासून जिओ नेटवर्क ठप्प; नागरिक त्रस्त

साटेली भेडशी, (प्रतिनिधी) : साटेली-भेडशी व परिसरात गेल्या सात दिवसांपासून जिओ मोबाईल नेटवर्क पूर्णपणे विस्कळीत झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मोबाईल कॉल लागत नाहीत, इंटरनेट सेवा बंद असल्याने ऑनलाइन व्यवहार, बँकिंग सेवा, शासकीय कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण, व्यापारी व्यवहार तसेच आपत्कालीन संपर्कही ठप्प झाले आहेत. ग्रामीण भागातील अनेक नागरिक जिओ नेटवर्कवर अवलंबून असल्याने त्यांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अनेकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप सेवा सुरळीत झालेली नसल्याची खंत व्यक्त केली आहे. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना या समस्येचा फटका बसत असून, आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणेही कठीण झाले आहे. त्यामुळे संबंधित कंपनीने या समस्येची तातडीने दखल घेऊन नेटवर्क सेवा पूर्ववत करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

साटेली-भेडशी परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारी ही गंभीर समस्या तात्काळ सोडविण्यासाठी जिओ कंपनीने आवश्यक तांत्रिक उपाययोजना करून सेवा पूर्ववत करावी, अन्यथा नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg