loader
Breaking News
Breaking News
Foto

पुणे: पंढरीच्या वारीसाठी मानाच्या पालख्यांचे प्रस्थान झाले असून बुलढाण्यातून श्री संत गजानन महाराज यांची पालखी निघाली असून जळगावमधून संत मुक्ताईंची पालखीची देखील वारी सुरू झाली आहे. शासनानेही वारीची तयारी सुरू केली असून लाखो वारकऱ्यांसाठी सर्वोतोपरी सुविधा पुरवण्याबाबत आढावा बैठकही घेण्यात आली. यंदाच्या आषाढी (Ashadhi) एकादशी वारीसाठी मानाच्या पालख्यांसोबत पंढरपूरला जाणाऱ्या 1400 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये इतके अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली असून, यासाठी 2 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आषाढी वारी ही महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी आणि पवित्र पायी यात्रा आहे. दरवर्षी आषाढ शुद्ध एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भक्त (वारकरी) पायी चालत पंढरीत दाखल होतात. 'ज्ञानोबा-तुकाराम' असा जयघोष करत, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि शिस्तीत चालणारी ही वारी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg