दापोली (प्रतिनिधी) : दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत "कृषी स्नेही" व "कृषी सखी" रावे (RAWE) विद्यार्थिनींतर्फे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, वणौशी गुरववाडी येथे ५८ वा महाराष्ट्र कृषी दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कृषी स्नेही व कृषी सखी रावे गटाने वणौशी गावाचा PRA नकाशा सादर करून गावातील १२ वाड्या, नैसर्गिक संसाधने तसेच गावाची वैशिष्ट्ये उपस्थितांसमोर मांडली.यावेळी विद्यार्थिनी श्रावणी मोरे यांनी महाराष्ट्र कृषी दिनाचे महत्त्व विशद केले, तर विद्यार्थिनी समृद्धी जाधव यांनी आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त महिला शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानावर प्रकाश टाकला. विद्यार्थिनी स्वरा गुरव हिने आधुनिक शेती विषयावर भाषण केले, तर विद्यार्थी नील गुरव व स्वयंम बारे यांनी कृषीविषयक कविता सादर केली.
वणौशी येथे आयोजित केलेल्या चित्रकला व "टाकाऊपासून टिकाऊ" स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त उपस्थित महिला शेतकऱ्यांचा कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.यावेळी दत्ताप्रसाद मोरे व गोपाल परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर डॉ. विजय देसाई, डॉ. अशोक चव्हाण आणि डॉ. रमेश कुणकेरकर यांनी आधुनिक शेती, कृषी शिक्षण, विद्यापीठाचे विविध उपक्रम तसेच कृषी क्षेत्रातील संधींबाबत विद्यार्थी व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.या कार्यक्रमानंतर कृषी जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर मान्यवर, शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्या सहभागातून ५० वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाचे मुख्य सूत्रसंचालन अंकिता मुंज व आकांक्षा गाडगे यांनी केले, तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल झिरवाळ हिने केले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रवीण झगडे यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नीलम मदने, तन्वी नादिवडेकर, श्रुती बोबडे, साक्षी लोके, सलोनी सावंत, श्रावणी मोरे, अंकिता मुंज, आकांक्षा गाडगे, कोमल झिरवाळ व समृद्धी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, रावे समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्रप्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ. संजयकुमार तोरणे, डॉ. सचिन पाठक व डॉ. रणजीत महाडिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण झगडे, डॉ. आशिष शिगवण, श्रेयस पवार, तसेच सरपंच प्रतिभा दवंडे, उपसरपंच प्रकाश तेरेकर, कृषी अधिकारी, शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.