loader
Breaking News
Breaking News
Foto

अर्धा तासाच्या प्रवासासाठी लागतोय एक तास; संगमेश्वर देवरुख राज्य मार्ग खड्डेमय

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - संगमेश्वर–कोल्हापूर राज्य मार्गावरील संगमेश्वर ते देवरुख हा रस्ता पुन्हा एकदा खड्डेमय झाला असून वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. अवघ्या अर्ध्या तासाचा प्रवास करण्यासाठी आता तब्बल एक तास लागत असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संगमेश्वर ते बुरंबी या पट्ट्यातील खड्डे भरून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र, मुसळधार पावसामुळे ही दुरुस्ती टिकली नाही आणि रस्त्यावर पुन्हा मोठमोठे खड्डे पडले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रस्त्यावरील अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वाहनांचे नुकसान होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. स्थानिक नागरिक, व्यापारी आणि वाहन चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे. पावसाळ्यात तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी दर्जेदार आणि कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचेही नागरिकांनी नमूद केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg