मुंबई (दिपक साळवी ): बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी एक आणि बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी एक असणारा ‘तुळशी तलाव’ मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४३ वाजता पूर्ण ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईत होत असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी दिनांक ७ जुलै २०२६ च्या रात्री ९ वाजता 'विहार' तलाव ओसंडून वाहू लागला, आणि त्या पाठोपाठ लगेचच रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी 'तुळशी' तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. मात्र, असे असले तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील एकूण जलसाठा हा कमाल क्षमतेच्या ४१.४३ टक्के इतका झाला आहे.
तुळशी तलाव हा गेल्या वर्षी दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी भरून वाहू लागला होता. तर सन २०२४ मध्ये हा तलाव ४ ऑगस्ट रोजी भरून वाहू लागला होता. ८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्त जलधारण क्षमता असणारा हा तलाव बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
तुळशी तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे :- √ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे. √ या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले. √ या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. √ या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. √ तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा असतो. (८०४६ दशलक्ष लीटर) √ तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.









1.jpg)





















































8.jpg)

































.jpg)



































































7.jpg)






























































6.jpg)












































































5.jpg)

















































4.jpg)




































































































































































































































































































































































































.jpg)







































































































































1.jpg)




.jpg)





















































































































































































































.jpg)



















































































































































































1.jpg)





























































































3.jpg)




































































































































































































2.jpg)































































































































































































.jpg)

















3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.