loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर वरचापाट येथील सोमेश्वर तलावाचे होणार पुनरुज्जीवन...

वरवेली, (गणेश किर्वे ):- गुहागर शहरातील ऐतिहासिक असलेल्या सोमेश्वर तलावाच्या पुनर्जीवनासाठी "केंद्र पुरस्कृत अमृत २' अभियानातून तब्बल ९८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सप्टेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या या कामाच्या निविदा प्रक्रियेचा फेरा संपुष्टात आला असून सोलापूरमधील 'शिवतेज कन्ट्रक्शन' या ठेकेदाराने या तलावाचे पुनरुज्जीवनाचे काम घेतले आहे यामुळे लवकरच या सोमेश्वर तलावाचे सुशोभिकरण केले जाणार असून गुहागरच्या पर्यटनासाठी ही जमेची बाजू ठरणार आहे. गुहागर शहरात असलेल्या मंदिरांबरोबर या मंदिरासमोरील तळ्यांची वेगळी ओळख आहे. शहरातील वरचा पाट येथील दत्त मंदिर, दुगदिवी मंदिर, सोमेश्वर मंदिर, गुहागर नाक्या समोरील श्री देव व्याडेश्वर मंदिर, खालचा पाट येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर, घारमभट नारायण मंदिर आणि बारटक्के तलाव असे एकूण ७ तलाव गुहागर शहरांमध्ये आहेत. या तलावांचे सुशोभिकरण झाले तर पर्यटनासाठी फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २ अभियानांतर्गत सोमेश्वर तलावाच्या पुनर्जीवनासाठी नगरपंचायतीच्या वतीने प्रस्ताव करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

३ सप्टेंबर २०२५ रोजी याला प्रशासकीय मान्यता मिळाली होती. त्यानंतर याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. सुरुवातीच्या दोन्ही निविदा प्रक्रिया यशस्वी झाल्या नाहीत. यामुळे तिसऱ्या निविदा प्रक्रियेमध्ये कमीत कमी दराने निविदा सादर करणाऱ्या ठेकेदाराला सदर काम देण्यात आले आहे. सुमारे ९८ लाख रुपये निधी या तलावाच्या सुशोभिकरणासाठी मंजूर झाला असून सोलापूर येथील शिवतेज कन्ट्रक्शन यांना हे काम देण्यात आले आहे. निविदा मंजूर झाल्यावर ठेकेदाराने सुरक्षा ठेव रक्कम भरावयाची असते ती भरण्यास विलंब केला होता अखेर १६ जून २०२६ रोजी सुमारे ९ लाख रुपये सुरक्षा ठेव रक्कम या ठेकेदाराने भरली आहे. ज्या ठेकेदाराला सदर तलावाच्या सुशोभिकरणाचे काम देण्यात आले आहे त्या ठेकेदाराने कामाच्या मूळ रक्कमेपेक्षा तब्बल १८.२२ टक्के कमी दराने निविदा भरून काम मिळवले आहे यामुळे सदर काम दर्जेदार करून घेण्यासाठी ग्रामस्थांना सतर्क राहावे लागणार आहे.

टाइम्स स्पेशल

शहरातील तलावाच्या सुशोभिकरण हे पहिलेच काम होणार असल्याने व ते पर्यटनासाठी अधिक फायद्याचे ठरणार असल्याने सदर काम चांगल्या पद्धतीने कसे होईल यासाठी ग्रामस्थांना दक्ष राहावे लागणार आहे. तलावा सोमेश्वर सुशोभिकरणामध्ये तलाव स्वच्छ करणे,तलावातील गाळ उपसणे, ज्यामध्ये चिखल आणि दगड काढणे, तलावा काठाच्या सुरक्षेकरता गॅबिन तयार करून तिच्याभोवतीची भरणी करणे. पाथवे तयार क तलावाच्या संपूर्ण मितीला बसवणे, तलवासमोर बगीचा करून त्यामध्ये बसण्यासाठी वीज व्यवस्था करण्यात येणार आहे. एकंदरीत पाहता मंदिरासमोरील तळ्याला एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg