loader
Breaking News
Breaking News
Foto

सोवेलीत मृदगंध आणि वसुंधरा गटाकडून वृक्षारोपण कार्यक्रम

दापोली (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताच्या औचित्याने दापोली तालुक्यातील सोवेली येथे रावे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषी दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्ष दिंडीने करण्यात आली. या कृषी दिंडीत कृषी विषयक घोषणा देण्यात आल्या तसेच ’सीड बॉल, हा लक्षवेधी उपक्रम राबविण्यात आला ज्याने जंगल वाढीचा संदेश मिळाला. या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांनी शेतकरी वेशभूषा परिधान करून आपला सहभाग दर्शवला. कार्यक्रमाला वनरक्षक प्रभु साबने यांनी निसर्गाचे महत्व पटवून देणारे मार्गदर्शन केले तर सोवेली ग्राम पंचायतीचे सरपंच जयेश मानकर यांनी शेतीचे महत्त्व सांगून नवीन पिढीला शेती करण्यासाठी प्रोत्साहित केले. गट मृदगंधच्या विद्यार्थिनींनी शेती विषयक प्रसंगवर्धक पथनाट्य सादर केले व त्यातून आधुनिक शेतीपद्धती, नवनवीन तंत्रज्ञान, कृषी विषयक समस्या व त्यांचे उपाय यांबद्दल जनजागृती केली. कार्यक्रमाचा समारोप वृक्ष वाटप उपक्रमाने करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg