loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबवली मधील न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू काॅलेज आंबवली विद्यालयात वनमहोत्सव निमित्ताने "रान पालेभाजी प्रदर्शन" उत्साहात

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील आंबवली गावातील पंचक्रोशी न्यु इंग्लिश स्कूल कमिटी आंबवली संचालित न्यु इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आंबवली विद्यालयात रान पालेभाजी प्रदर्शन पार पडले. या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपआपल्या गावातुन अळू, तेरा, टाकळा, भारंगी, कुड्याची फुले, शेवग्याची पाने इत्यादी. विविध प्रकारच्या रानातील पालेभाजी आणल्या होत्या. प्रत्येक पालेभाजीचं महत्त्व व उपयोग विद्यार्थ्यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर प्रदर्शनाला विद्यालयातील मुख्याध्यापिका यादव यांनी प्रास्ताविकातून व मार्गदर्शनातुन आपल्या पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल कसा राखला जातो, याची उदाहरणे देऊन निसर्गाच्या कुशीत राहणारे आपण ग्रामीण लोकं रानपालेभाजीचे औषधी गुण समजून घेऊन त्या उपयोगात आणतो, हे समजावून सांगितले व प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व काॅलेजचे शिक्षकांनी या प्रदर्शनात भेट देऊन शुभेच्छा दिल्या व आनंद व्यक्त केला. सदर उपक्रम विद्यालयाचे सांस्कृतिक व हरित सेनेचे प्रमुख शिर्के एस. टी.यांनी आयोजित केला. सर्व विद्यार्थ्यांनी सदर प्रदर्शनाला आनंदाने व उत्साहाने सहभागी होऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg