loader
Breaking News
Breaking News
Foto

कडवईच्या आराध्य नारकरची शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी; तालुक्यात चौथा, तर जिल्ह्यात १२वा

शास्त्रीपूल (वार्ताहर) : कडवई गावचा सुपुत्र तथा विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट इंग्लिश मिडीयम स्कूल, डेरवणचा विद्यार्थी आराध्य अभिराज नारकर याने इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात चौथा, तर जिल्ह्यात बारावा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे कडवई पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आराध्यने सीबीएसई व आयसीएसई गटातून ही परीक्षा दिली होती. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारच्या कोचिंग क्लासचा आधार न घेता स्वतःच्या जिद्द, सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश मिळविले. या यशासाठी त्याला वैदेही जोशी, रेणुका सरपोतदार, रिया साळुंके, यश कापडी आणि अनन्या जोगळेकर या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आराध्यच्या या यशामागे त्याची आई डॉ. अश्विनी नारकर यांनी घेतलेली अथक मेहनत आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची नियोजनबद्ध तयारी करून घेत आराध्यला सातत्याने अभ्यासासाठी प्रेरित केले. त्यामुळेच कोणत्याही खासगी शिकवणीशिवाय त्याने हे उल्लेखनीय यश मिळवून आपल्या गुणवत्तेची छाप पाडली. आराध्यच्या यशाबद्दल त्याचे आजोबा डॉ. भगवान नारकर यांनी त्याचे विशेष कौतुक करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यात आपल्या आजोबांप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची त्याची इच्छा असून, अभ्यासाबरोबरच अभिनयाचीही त्याला विशेष आवड आहे.

टाईम्स स्पेशल

आराध्यच्या या यशाबद्दल कडवई पंचक्रोशीतील नागरिक, शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शाळेतील शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मेहनत, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर यश संपादन करता येते, याचे आराध्य नारकर हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg