loader
Breaking News
Breaking News
Foto

खेरशेत गावचे लेखक मिलिंद कदम यांचा अजेय लेखणी पुरस्काराने सन्मान

वरवेली(वार्ताहर)- ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने मुंबई येथे आयोजित उल्लेखनीय काम करणार्‍या लेखक आणि पत्रकार यांच्या पुरस्कार सोहळ्यात येथील खेरशेत गावचे मिलिंद कदम यांना अजेय लेखणी पुरस्काराने गौरविण्यात आले. मिलिंद कदम शासकीय सेवा बजावत असतानाच सामाजिक कार्यात झोकून काम करीत आहेत. विविध विषयी लिखाण करीत ते समाजातील प्रश्नांना वाचा फोडत आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेत ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने त्यांचा ‘अजेय लेखणी’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ज्येष्ठ साहित्यिक विसुभाऊ बापट, साहित्यिक अरुण म्हात्रे यांच्या हस्ते मिलिंद कदम यांना अजेय लेखणी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मिलिंद कदम यांचे कौतुक केले जात असून विविध क्षेत्रातील मान्यवर त्यांचे अभिनंदन करीत आहेत. समाजातील तळागाळातील प्रश्नांना वाचा फोडणार्‍या पत्रकारांचा आणि समाजासाठी झटणार्‍या नि:स्वार्थ समाजसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ‘आर्यारवी एंटरटेनमेंट’च्या वतीने हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

टाइम्स स्पेशल

चिपळूणच्या सुपुत्राला अजेय लेखणी पुरस्काराने गौरवण्यात आल्याने आनंद व्यक्त होत आहे. यावेळी आर्यारवी एंटरटेनमेंटचे सर्वेसर्वा महेश्वर तेटांबे ज्येष्ठ पत्रकार, समाजसेवक प्रभाकर तोडणकर यांच्यासह मान्यवर यांचे उपस्थितीत मिलिंद कदम यांना गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg